loader image

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड व नांदगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न

Sep 22, 2023


नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. पक्षाची हीच ओळख आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने तसेच मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याप्रती निष्ठा असलेल्या निष्ठावंतांना एकत्र आणण्यासाठी तसेच मतदारसंघातील तळागाळातील युवकांना एकत्र आणून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नांदगाव विधानसभा मतदारसंघात होऊ द्या चर्चा जोरदारपणे सुरु असून यामध्ये शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे त्यामध्ये युवकांची संख्या लक्षणीय आहे. नांदगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात खेडयात चौकाचौकात, बांधाबांधावर शिवसैनिक सर्वसामान्य गृहिणी व्यापारी, नोकरदार, विद्यार्थीवर्ग यांच्याशी हो या चर्चा कार्यक्रमाद्वारे संवाद साधत आहे. मनमाड शहरातील सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत होऊ द्या चर्चा कार्यक्रम शुक्रवार दि.१५/०९/२०२३ रोजी सप्तश्रृंगी माता मंदिर, मनमाड येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाद्वारे दिंडोरी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मा. श्री. जयंतरावजी दिंडे, सहसंपर्कप्रमुख प्रविण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारीया, जिल्हा समन्वयक सुनिल पाटील, तालुकामुख संतोष गुप्ता, विधानसभा संघटक संतोष जगताप,शहरप्रमुख माधव शेलार, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, सुधाकर मोरे, योगेश वाघ, विजय दराडे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. होऊ द्या चर्चा मध्ये आजच्या राजकीय परिस्थितीबाबत पक्षाची भुमिकेचा समावेश करण्यात आला, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ३२ टक्के मतदान घेणारे सत्तेत आहेत मात्र ६८ टक्के मतदान घेणारे विरोधी बाकावर बसले आहेत, सामान्य जनतेसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गॅस चे दर ४९० वरून १९८० पर्यंत वाढलेला आहे, दिवसेंदिवस देशातील कुपोषणाचे व भुकबळीचे प्रमाण वाढत चालले आहे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले मात्र तसे झाले नाही उलट सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण सुरु आहे. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होणार असे जाहीर झाले मात्र मिळाले नाही. मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे जाहीर केले मात्र अद्याप कामाला सुरुवात मात्र झाली नाही, ना धनगर समाजाला आरक्षण मिळाले ना मराठा समाजाला मिळाले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली, दहशतवाद थांबला नाही, गंगाही स्वच्छ झाली नाही, जागतिक स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला व काळे धनही भारतात आले नाही आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सदर होऊ द्या चर्चा या कार्यक्रमास महिला आघाडी जिल्हाउपप्रमुख मुक्ताताई नलावडे, रेणुकाताई जयस्वाल, कविताताई छाजेड, तालुकाप्रमुख लिलाताई राऊत, किरणताई शिंदे, सुरेखाताई मोरे इ. महिला पदाधिकारी उपस्थित होते तसेच मनमाड व नांदगाव तालुका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.