loader image

गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

Sep 28, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शना खाली पोषण वाटीका,परसबाग तयार करणे तसेच संगोपन व संवर्धन करणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.. अंगणवाडी केद्र परीसरात उपलब्ध जागेनुसार शेवगा,कडीपत्ता,पपई,पेरू,सिताफळ,भोपळा,पुदीना,फळझाडे,भाजीपाला,फळभाज्या औषधी वनस्पती,इतरही झाडाची लागवड करुन परस बाग तयार करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे विषयी किशोरी,महिला,माता,लाभार्थी वर्ग यांना मार्गदर्शन करण्यात आले.
. परस बाग ,पोषण वाटीकासाठी जागेची मर्यादा नाही ..गच्चीवर,अंगणात,कुंडीत ही पोषण वाटीका करता येते.कमी कालावधीत फळे,भाजीपाला घरच्या घरी मिळविण्यास मदत होते. तसेच ताज्या हवेसह उत्तम प्रतीचा प्राणवायु मिळण्यास मदत होते. काही औषधी वनस्पतीची लागवड कुंडीत करता येते. तसेच पालकांना परस बाग,पोषण वाटीकाची लागवड करतांना सेद्रींय पध्दतीने करण्यास सांगितले.
सांडपाण्याची विल्हेवाट करुन छान परस बाग,पोषण वाटीका फुलवता येईल. अशा रीतीने मार्गदर्शन गृहभेटीच्या माध्यमातुन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.