loader image

मनमाड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न

Sep 28, 2023


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम होते . त्यांनी आपल्या मनोगतातून वाणिज्य शाखेचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले, प्रमुख पाहुणे मा.अजित बेदमुथा, एन.आर ब्रदर्सचे संचालक यांनी वाणिज्य मंडळाचे उद्घाटन जाहीर केले. व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना करिअर आणि संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. दुसरे पाहुणे म्हणून सीए राजेंद्र दागनी सर पुणे यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशनसाठी
लागणाऱे कौशल्य आणि त्या आधारित कोर्स बाबत सविस्तर माहिती दिली. तिसरे प्रमुख पाहुणे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक मनमाड श्रीमती जान्हावी सेन मॅडम यांनी डीजीटीलायझेशन ऑफ बँकिंग ऑनलाईन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.आर.डी.भोसले सर
यांनी वाणिज्य मंडळाचे उद्देश व योगदान आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील मुसळे, प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस डी थोरे, तर आभार प्रदर्शन प्रा. समाधान सूर्यवंशी यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ . आरती छाजेड आणि डॉ.व्ही.एस नजरधने सर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कुलसचिव, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.