loader image

निमगाव, कळवाडी आणि सौंदाणे गटात होऊ दे चर्चा अभियान संपन्न

Oct 14, 2023


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविला जात असून सदा अभियानास जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. ११३- नांदगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेला अडीच गट निमगाव गट सौदाणा पट कळवाडी गट या तिन्ही गटात केंद्र व राज्य सरकारचा भांडाफोड करण्यासाठी तसेच शासनाने घोषीत केलेल्या योजना खोटे आश्वासन प्रत्यक्षात सामान्य जनतेपर्यंत पोहचल्या की नाही याची विचारणा करण्याकरीता होऊ द्या चर्चा हा अनोखा कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र उपनेते डॉ. अद्रय आबा हिरे, उपनेते सुनिलभाऊ बागुल, दिंडोरी संपर्कप्रमुख जयंतभाऊ दिंडे, जिल्हाप्रमुख गणेशभाऊ धात्रक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निमगाव गट, सौदाणा गट व कळवाडी गट या गटात दि.०८ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान संपन्न झाला. सदर होऊ द्या चर्चा कार्यक्रमामध्ये राज्य व केंद्र सरकारने जनतेचे कोटयावधी रुपये खर्च करून सरकार आपल्या दारी या फसव्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. सरकारने विविध योजनांच्या नावाखाली शाळा बंद केल्या सरकारी नोकर भरती बंद करून कंत्राटी कामगारांची संख्या वाढविली, पेट्रोल व डिझेल शंभरी पार झाले तसेच घरगुती गॅस दर हजारांच्या पर पोहचले आहे. जनतेला आरक्षणाचे गाजर दाखवून फसवणुक फसवणूक करण्यात येत आहे. राज्यभरात वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे अशाप्रकारे सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे अशा विविध सरकारी या योजनांचा पर्दाफाश करण्यात आला.

सदर होऊ द्या चर्चा कार्यक्रमप्रसंगी जिल्हाउपप्रमुख संतोषभाऊ बलीद, उपजिल्हाप्रमुख,मालेगावचे प्रमोद शुक्ला, मालेगाव तालुकाप्रमुख रामा मिस्त्री, उपजिल्हाप्रमुख समाधान देतकर, महानगरप्रमुख मालेगाव राजाराम जाधव, जिल्हा संघटक संजय कटारीया, नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, विधानसभा संघटक संतोष जगताप, मनमाड शहरप्रमुख माधव शेलार, मनमाड मार्केट कमिटीचे उपसभापती कैलास भाबड, मनमाड कृ. उ. बा. समितीचे संचालक सुभाष उगले, रमेश कराड, युवासेना नांदगाव तालुकाप्रमुख सनी फसाटे, राजाभाऊ आहेर, अनिल सापनर, पप्पु सुर्यवंशी, चेतन सांगळे, राहुल सांगळे, कडू पाटील हिरे, समाधान हिरे, विकी खैरनार तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी, युवासेनेचे सर्व पदाधिकारी व तिन्ही गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य, पंचायतीचे सदस्य व मालेगाव मार्केट कमिटीचे संचालक मंडळ व नांदगाव व व तालुक्यातील सर्व शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रेम सर्व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.