मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते मिझाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच शालेय ग्रंथालयातील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणा-या विविध विषयांवरील पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती.
*यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेवाळे भुषण दशरथ,संस्था सदस्या आयशा सलीम गाजीयानी मॅडम,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम तसेच शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन केले.तसेच मुख्याध्यापक भुषण शेवाळे,संस्था सदस्या आयशा गाजियानी व शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. व पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले. नियमित वाचनाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले. संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
राशी भविष्य : २६ऑगस्ट २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....







