loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तहसील कार्यालयात होतेय सर्वसामान्यांची पिळवणूक – समता परिषदेचे तहसीलदारांना निवेदन

Oct 16, 2023


अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्षा सौ. पूजा आहेर एंडाईत यांनी नांदगाव तालुक्यातील तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देऊन महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
नांदगाव तालुक्यातील महिला व गोरगरीब व्यक्तींचे नांदगाव तहसील कार्यालयात कामे होत नाही. अर्ज देऊनही व सर्व पूर्तता करूनही कामे होत नाही. घरकुल योजना, रेशनकार्ड, नवीन रेशन कार्ड, बारकोड नंबर, दुय्यम रेशन कार्ड, रेशनकार्ड ऑनलाइन करणे, ऑनलाइन दुरुस्ती करणे, श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, विधवा पेन्शन योजना, सांप्रदाय मंडळ पेन्शन योजना इतर कामे होत नाहीत. अर्जदार चकरा मारून फेरे मारून थकून जातो. अर्जदार हा मजुरी करणार वर्ग असल्याने त्याला वारंवार चकरा मारणे परवडत नाही. अशिक्षित असल्याने त्यांना सहकार्य केले जात नाही. उलट त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देऊन त्यांना मानसिक त्रास दिला जातो. तरी महिला व गोरगरिबांची कामे लवकरात लवकर व्हावित असे निवेदन तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला जिल्हाध्यक्षा सौ. पूजा आहेर-एंडाईत, अ. भा. म. फुले समता परिषद महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, अ. भा. म. फुले समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील, अ. भा. म. फुले समता परिषद शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, माणिक बाविस्कर, रंजना सोनवणे, प्रमिला आहेर, निर्मला आहेर, मंगला बोरसे, ताराबाई तावडे, विजया बोरसे, जयश्री खैरे, आशा खैरनार, बाळू सोनवणे, भारत ठाकरे, दायकु दळवी, पुनमचंद चव्हाण, माया मोरे, लंकू मोरे, विमलबाई सोनवणे, इंदुबाई ठाकरे, वंदना ठाकरे, अनिता वाघ, बाईजाबाई दळवी, नायजाबाई दळवी, पातळाबाई मोरे, मंगलाबाई सोनवणे, सिंधू दळवी, कमा दळवी, उषा दळवी, सुनीता जगधने, नर्मदाबाई आहेर, गीता दळवी, पुष्पा मोरे, मायाबाई मोरे, अनिता दळवी, अंजनाबाई चव्हाण, वैशाली चव्हाण, सुरेखा चव्हाण, सिंधुबाई चव्हाण, कौशलाबाई चव्हाण, सखुबाई चव्हाण, देविदास राठोड, धर्मा पवार, जनाबाई चव्हाण, सुशीला पवार, सुरेखा मोकळ, बबलू चव्हाण, तुकाराम माळी, विक्रम तावडे, सुनिता आहेर, सौदराबाई चव्हाण, सुनीताबाई मुकणे इत्यादी महिला व व्यक्तींनी निवेदनात सह्या केल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.