loader image

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

Oct 17, 2023


मनमाड :- श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.अहिरे एस. डी. यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. खैरनार के.के.यांनी डॉ.ए.पी.जे. कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती देतांना सांगितले की,जीवनात अनेक सुख सोईचा अभाव असतांनाही डॉ.कलाम हे भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहचले ही गोष्ट सर्वांना प्रेरणादायी आहे.त्यांनी भारताच्या अंतरीक्ष वैज्ञानिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. अनेक पुस्तके लिहिलेली आहेत.त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना सन 1997 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न किताब देवून सन्मानित केलेले आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. गावित एम.एम.यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

.