loader image

नांदगांव पुरातन दगडी वेशीचा एक- एक दगड कोसळू लागला प्रशासन, लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

Nov 21, 2023


 

 

नांदगांव : मारुती जगधने नांदगाव शहराची शान असलेले शहरातील शिवस्फुर्ती मैदानावरील वेश मोडकळीस आली असून त्याची दुरूस्ती वेळेत न झाल्यास पुरातन वेश नेस्तनाबूत होईल याची भिती शहर वासीयांना वाटते आहे .वेशीवरील एका बाजुचे दगड कोसळले आहेत तसेच वरच्या दगडी बांधकामाला तडे पडले आहे. १०० वर्षापूर्वीची शहरातील दगडी वेश दुरुस्तीची प्रतिक्षा करीत आहे . यासाठी दानशुर व निसर्गप्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे . सध्या वेशीच्या वरच्या भागावार झाडे उगलेले असून झाडांची खोडे मजबुत झाली आहे या झाडांच्या मुळ्या दगडी वेशीत रूजत असल्याने झाडांची वाढ होत आहे ही झाडे आता मुळासगट काढली पाहिजे.
शिवस्फुर्ती वेशी वरील मजबूत दगडी बांधकाम सन १९३२ मध्ये झाले असावे. पूर्वी वेश एक वेळा दानशुरांनी किंवा प्रशासनाने दूरुस्ती केली असल्याचे दिसते. आता नव्याने पुन्हा शहराची वेश दुरुस्तीसाठी शहरवासीयांनी पुढे येऊन शहराला लाभलेला वारसा जतन करण्याची वेळ आली आहे जर ही वेश दुरुस्त झाली नाही व ती वेश ढासळल्यास इतिहास काळच्या पडद्या आड जाईल. आता इतिहास व शहर प्रेमींनी पुढे येऊन शहराची शान असलेली नांदगाव शिवस्फुर्ती मैदाना वरील दगडी वेश जतन करण्यासाठी व दुरुस्तीसाठी दानशुरांनी, प्रशासनाने, लोकप्रतिनीधींनी पुढे येण्याची गरज आहे .
वेश पूर्णपणे दगडी आहे वेशीच्या आतील भाग दुरुस्ती केल्याचे दिसत असून आता नव्याने दुरूस्ती करुन शहराला नवेरुप द्यावे अन्याथा दगड कोसळल्यास एखाद्याचे प्राण गमवण्याची शक्याता आहे .सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बॅरीकेट लाऊन धोक्याचा इशारा दिला आहे .परंतु येथे मुख्यप्रवेश व्दार असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात असते याचा विचरा झाला पाहिजे.


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.