loader image

नांदगाव तालुक्यात वादळ, वारा,आणी टपोऱ्या गारांनी शेती पिकांचे व वैरणच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

Nov 26, 2023


नांदगाव : मारुती जगधने
जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब चिंब भिजवुन गेला. दि २६ रोजी प्रचंड वादळ वारा, अतोनात गारांचा वर्षाव होऊन नांदगांव तालुक्यात गारांचा बे मोसमी पावसाने झोडपले.
वादळ गार पिटिने शेतातील कांदा चाळीतील साठवलेला कांदा, किट्टी केलेला चारा रचलेला चारा, हे सर्व गारा आणी वारा या मुळे भिजुन चिंब झाले सायंकाळी ४:३० वाजता पाऊसाल सुरुवात झाली सुरुवातीला १५ मिनीटे झिमझिम पाऊस नंतर त्या पाठोपाठ वादळ वारा त्यांच्या संहीत प्रचंड गारांनी तालुक्यातील एक ना एक गाव अक्षरशा झोडपुन काढले,
या शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या पावसामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत होता .
दुष्काळाने पोळलेला शेतकरी पावसाने पुरता कोलमडला गेला झालेल्या नुकासनीमुळे शब्द देखील उरले नाही अशा संताप जनक प्रतिक्रिया उमटल्या
वाऱ्या सोबत गारांचा एवढा पाऊस होता की शेतातील घराच्या दरवाजाच काय पण खिडकी देखील उघडली जात नसे एवढ्या प्रमाणात चक्रीवादळ घोंगावत होत, पञ्यांच्या छतावर आणी जमिनवर पडलेली गार दोन ते तिन इंच जाडीची होती.आनेकांनी गारा हातात, घेऊन दाखवल्या या दरम्यान उघड्यावरील जनावरे चांगलीच पाऊसा व गारांनी झोडपली गेली.या गारपिटीने प्रचंड गाणी झाली आता जनावरांना चारा उरला नाही कांदा पिके फोडुन काढली डाळिंबा,द्राक्षे, चारा पिके,चारा कुट्टूि, ,भुस,भुईमुंग शेंग,शेतात पडून आसलेली मका बिट्टी, विट भट्टी ,सह विविध पिकांचे नुकसान झाले .नांदगांव मनमाड रोडवरील
हिसवळ खुर्द येथील पेट्रोल पंपाचे वादळ वार्यात नुकसान झाले , स्टेशनचे मोठे नुकसान, तालुक्यातील
के डी देशमुख माध्यमिक विद्यालय हिसवळ खुर्द या शाळेच्या कार्यालयाचे पत्रे उडाल्याने साहित्याचं मोठे नुकसान,
घरावरील सौर ऊर्जेच्या पॅनल बोर्ड चेही अतोनात नुकसान,
थोडीफार पिक् होती ते अक्षरशा भुई सपाट झाले.
ठिकठिकाणी आसलेले सौर उर्जाप्लँटचे छते उडाली या नंतर ही पाऊस थांबलाच नाही राञी देखील पाऊस सुरूच होता.ढगांचा गडगडाट सुरूच होता, भितीदायक वादळ ,वारा, पाऊस, सुरूच होता दरम्यान शेतीच्या पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख महेंद्र बोरसे यांनी केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.