loader image

चांदवड भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

Dec 2, 2023


चांदवड – वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याचे मोबदल्यात १५०० रुपयाची लाच स्वीकारताना चांदवड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक अंजीनाथ बाबुराव रसाळ हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले. तीन हजार रूपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती १५०० रूपये घेतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती असून सदर शेतजमिनीची मोजणी करणेकरिता तारीख देण्याचे मोबदल्यात अंजीनाथ रसाळ यांनी तक्रारदार यांचेकडे १ डिसेंबर रोजी तीन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५०० रूपये घेताना शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर चांदवड पोलीस स्टेशन ,नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई चालू आहे.

लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 30 वर्ष.

आलोसे – अंजीनाथ बाबुराव रसाळ, वय- 50 वर्षे, व्यवसाय-नोकरी, मुख्यालय सहायक, पद- वर्ग 3, भूमी अभिलेख कार्यालय चांदवड ता चांदवड जिल्हा- नाशिक
लाचेची मागणी- दिनाक 01/12/2023 3000/- रुपये तडजोडीअंती 1500/- रूपये
लाच स्वीकारली – दिनांक 1/12/2023 रोजी 1500/- रुपये स्वीकारले

लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती असून सदर शेतजमिनीची मोजणी करणेकरिता तारीख देण्याचे मोबदल्यात आलोसे रसाळ यांनी तक्रारदार यांचेकडे दिनाक 1/12/2023 रोजी 3000 रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1500 रूपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे त्यांचेवर चांदवड पोलीस स्टेशन ,नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.

आलोसे यांचे सक्षम- मा.उपसंचालक भूमिअभिलेख, नाशिक प्रदेश ,नाशिक
सापळा अधिकारी – परशुराम कांबळे,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक -पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.