loader image

मनमाड चे सुपुत्र प्रा. डॉ. रुपेश मोरे यांची नामवंत शास्त्रज्ञांच्या यादीत निवड

Dec 2, 2023


मनमाड – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील गणितविभागप्रमुख प्रा. डॉ. रुपेश मोरे यांचा संशोधक क्रमवारीसाठी उपयुक्त असलेल्या शास्त्रज्ञांच्या गुणवत्ता यादीत नुकताच समावेश झाला. आहे.संशोधन क्रमवारी आणि विश्लेषणवर आधारित नामवंत असलेली
AD Scientific Index – 2024 च्या World Scientists Rankings – 2024 यांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे .या यादीचा उपयोग नोबेल पारितोषिक निवडीसाठी केला जातो.तसेच संशोधन फेलोशिपसाठी, विविध स्कॉलरशिप प्रदान करण्यासाठी ,उच्च विद्यापीठांमध्ये पदभरती करताना , पदोन्नती मिळण्यासाठी केला जात असतो.

AD Scientific Index” ही संस्था Google Scholar मधील h-index आणि i10 इंडेक्स स्कोअर आणि उद्धरणांवर आधारित शास्त्रज्ञांच्या एकूण आणि शेवटच्या पाच ते सहा वर्षांच्या उत्पादकता गुणांक दर्शविते.
एच-इंडेक्स हा लेखक-स्तरीय मेट्रिक आहे जो प्रकाशनांची उत्पादकता आणि उद्धरण प्रभाव दोन्ही मोजतो. डॉ. रूपेश मोरे यांनी याआधी नेट, सेट, पीचडी पदवी प्राप्त केली असून त्यांनी अमेरिकेतही आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये आपले संशोधन सादर केलेले आहे. विविध युजीसी केअर लिस्ट, वेब ऑफ सांयन्स अश्या नामवंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे पेपर प्रकाशित आहेत आणि विद्यापीठात पीएचडीचे गाईड म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
सदर यशासाठी महाविद्यालयाचे चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल, सचिव विकास कोटेचा, ज्येष्ठ संचालक ॲड प्रकाशचंद सुराणा,प्राचार्य प्राध्यपक अरविंद चौधरी, उपप्राचार्य डॉ विनोद चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे यांचे सहकार्य लाभले.
मूळचे मनमाडचे असलेले डॉ. रूपेश मोरे हे माजी मुख्याध्यापक श्री. तुळशीराम सुकदेव मोरे, मुख्याध्यापिका सौ. गंगुबाई तुळशीराम मोरे यांचे सुपुत्र आहेत.
सदर निवडीबद्दल डॉ. रुपेश तुळशीराम मोरे यांचे सर्व नातेवाईक, समाजातील विविध विभागाचे, विविध कार्यकारणीचे अध्यक्ष , सचिव, समाजबांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. रूपेश मोरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.