नांदगांव : मारुती जगधने
येथील पवन तिलोकचंद कासलीवाल यांच्या लक्ष्मीनगर येथील बंद घराचे चोरट्यांनी दरवाजाचा कडी कुलुप तोडुन सोनेचांदीचे ५७ हजाराचा मौल्यवान एैवज लंपास केला शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणी पहाटे पहाटे चोरी झाली या घटनेने नागरीक चकीत झाले.
घर मालक कुटुंबासोबत बाहेरगावी गेले असता चोरांनी बंद घराचा गैरफायदा उचलत दरवाजा तोडून आत प्रवेश काढून उचका-पाचक करुन सोने चांदीचे मौल्यवान वस्तू घेऊन लंपास झाले .या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करुन गुन्हा दाखल करुन घेण्याचे काम चालू केले. तपास पो नि प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजर ."गुरु आपल्याला अज्ञानाच्या...