loader image

पंचायत समिती प्रशासना विरोधात रास्ता रोको – १२ दिवसांपासून सुरू असलेल्या मंगळणे गावाच्या उपोषणकर्यांच्या मागण्या अद्याप दुर्लक्षित

Dec 11, 2023


नांदगाव : मारुती जगधने

मंगळणे गांव च्या ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी मागील करणार्या ग्रांमपंचायत सदस्यांनी पुकारलेले अमरण उपोषन १२ दिवसात सुटले नाही न्याय मिळत नाही म्हणून वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती प्रशासनाचा निषेध करीत २० मिनीटे नांदगाव येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी
विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदगांव ४० गाव नॅशनल हायवेवर २० मिनीटे रास्तारोको करण्यात आला मागण्या माण्य न झाल्यास गटविकास अधिकार्याची खुर्ची जाळू त्या नंतर हि मागण्या माण्य न झाल्यास राज्यपाल यांच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन प्रसंगी देण्यात आला .नांदगाव पंचायत समीती कार्यालयाच्या व्दारावर १२ दिवसा पासून आदीवासी महिला सरपंच मंगळणे ह्या ३ महिण्याच्या बाळाला घेऊन गैरव्यवहाराच्या व ग्रामसेवकाच्या कामकाजाची चौकशी ची मागणीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंचासह पाच सदस्ये आमरण उपोषनाला बसले आहेत त्यांना न्याय मिळत नाही.म्हणून ,प्रशासनाच्या विरोधात दहा नागरीकानी मुंडन करुन निषेध नोंदविला. त्याच्या मोबदल्यात प्रशासनाने ग्रामसेवकाच्या उपस्थितीत उपोषन कर्त्या पाटील पतीपत्नीचे अतिक्रमीत घर सुडापोटी तोडण्यात आले . असा आरोप आंदोलन प्रसंगी करण्यात आला .न्याय मिळत नाही म्हणून रास्तारोको करण्यात आला .
शक्यतितक्या लवकर न्याय द्या अन्यायाला वाचा फोडणे गुन्हा आहे. का? प्रशासनातील डोंम कावळे
,मानवी वस्तीत शिकार करतात यांचा बंदोबस्त करण्याचे कामं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केले जाईल .असा इशारा बाळासहेब बोरकर यांनी दिला. या प्रसंगी
डाॅ नितीन सोनवने,कपिल आहिरे,किरण मोरे,प्रकाश धिवर, शेखर पगार
यांची शासनाचा निषेध करणारी भाषने झाली यावेळी नांदगांव नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले .दरम्यान
रामभाऊ पवार,शेखर पगार,सुदर्शन पवार,सागर पवार,सोनु पाटील, अभिषक पाटील, अक्षय
पवार,बाळू पवार,दादा गायकवाड,विलास पवार या १० उपोषणार्थीनी शासनाच्या निषेध म्हणून मुंडन केले. निषेध करुन दहाव्या दिवशी मुंडन करुन शासनाच्या बेफिकिरी कारभाराचे दहावे घातले .
दरम्यान सरपंच वैशाली रामभाऊ पवार यांची व त्यांच्या ३ महिण्याच्या बाळाची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुगनालायात दाखल करण्यात आले त्या नंतर दि ११ नोव्हेंबर रोजी नांदगांव येथे हुतात्मा चौकार रस्ता रोको करण्यात आला व पुन्हा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.