loader image

चांदवड येथे संपूर्ण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निषेध सभा

Dec 11, 2023


चांदवड – येथे महाविकास आघाडी तर्फे चांदवड मुंबई आग्रा महामार्ग चौफुली येथे पवारांची नुकतीच निषेध जाहीर सभा संपन्न झाली.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे ,आमदार शिरीष कुमार कोतवाल, डॉक्टर डी एल कराड, गणेश धात्रक, अनिल आहेर, गजानन शेलार, नितीन दादा आहेर ,अनिल धामणे ,योगिता पाटील ,अवंती राठोड, कविता पवार, माजी आमदार नितीन भोसले , जगन्नाथ धात्रक, गोकुळ पिंगळे, सयाजी गायकवाड, माणिक शिंदे, उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी माननीय शरद पवार यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढले. यावेळी शेतकऱ्यांची संवाद साधताना शिरीष कुमार कोतवाल यांचा कंठ भरून आला आणि भाविक होऊन आपले भाषण पूर्ण केले.
भाषणामध्ये श्रीराम शेटे, माणिकराव शिंदे, अनिल आहेर, . सटाण्याच्या माजी आमदार दीपिका चव्हाण, सयाजीराव गायकवाड, आदी वक्त्यांची भाषणे झाली. सदर सभा तब्बल दोन तास चालली असून रस्त्याच्या दुतर्फी बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी नाशिक जिल्ह्यातील दंगा पथक ॲम्बुलन्स, चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पीआय कैलास वाघ, मनमाड चे डेपोटी सोहेल शेख, चांदवड चे तहसीलदार मंदार कुलकर्णी, प्रांत, पुलकित सिंह ,व इतर शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पवार साहेबांनी असे सांगितले की मी स्वतः उद्या दिल्लीला जाऊन हा प्रश्न केंद्राच्या पार्लमेंटमध्ये मांडेल जर काय ॲक्शन न घेतल्यास सर्व शेतकरी माझ्या पाठीशी उभे राहा अशी साथ देखील शेतकऱ्यांना शरद पवार यांनी घातली. यावेळी मोठ्या हजारोंच्या संख्येने चांदवड तालुक्यातील शेतकरी व इतर मालेगाव उमराणे येवला चांदवड सिन्नर नांदगाव नाशिक येथील तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आलेले होते. यावेळी शरद पवार यांच्यासोबत मोठा शासकीय फौज फाटा लवाजमा उपस्थित होता. याप्रसंगी चांदवड येथील शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रकाश शेळके ,राष्ट्रीय काँग्रेसचे, चांदवड शहराध्यक्ष नंदू भाऊ कोतवाल, रिजवान घाशी ,सुभाष शेळके, विजय शेळके, तसेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व निषेध सभेमध्ये कम्युनिस्ट पार्टीने पाठिंबा दिला . कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.