loader image

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

Jan 4, 2024


नाशिक – राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे या महोत्सवाचे समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून हा महोत्सव सर्वांच्या सहभागाने यशस्वी करावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे झालेल्या बैठकीत दिल्या.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी तपोवन मैदानावर होणार आहे. त्यामुळे तेथील आवश्यक सर्व सोयी सुविधांचे नियोजन करण्यात यावे. तसेच कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावरील आसन व्यवस्था, ग्रीनरूम मधील सुविधा तसेच विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृह याबाबत आढावा घेण्यात आला. यासोबतच या महोत्सवानिमित्त मॉनिटरिंग करणारे महत्वाच्या अधिकारी व संबंधित व्यक्तींचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास धिवसे दुरदृष्यप्राणालीद्वारे तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, क्रीडा उपसंचालक रविंद्र नाईक, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील,अविनाश टिळे यांच्यासह महोत्सव समिती व उपसमितीचे सदस्य उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.