loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपर फास्ट एक्स्प्रेस ला जानेवारी पर्यंत मुदतवाढ

मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपर फास्ट एक्स्प्रेस ला जानेवारी पर्यंत मुदतवाढ

सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मनमाड उन्हाळी...

read more
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्षपदी अशोक रघूनाथ (खैरणार) पाटील

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्षपदी अशोक रघूनाथ (खैरणार) पाटील

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक येथे भुजबळ फॉर्म वर अखिल भारतीय समता परिषद चे संस्थापकीय अध्यक्ष माजी...

read more
पोषण माह २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केंद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”–शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

पोषण माह २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केंद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”–शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग. आज...

read more
माझ्या अभ्यासाचा संशोधन वृतीचा फायदा मी माझ्या नांदगावला देण्यासाठी सदैव तयार आहे – राष्ट्रीय संशोधक डॉ . ओमप्रकाश कुलकर्णी

माझ्या अभ्यासाचा संशोधन वृतीचा फायदा मी माझ्या नांदगावला देण्यासाठी सदैव तयार आहे – राष्ट्रीय संशोधक डॉ . ओमप्रकाश कुलकर्णी

नांदगांव सोमनाथ घोंगाणे सततच्या औद्योगिक व व्यावसायिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

read more
आमदार कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्याची व संसारोपयोगी वस्तूंची मदत

आमदार कांदे यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्याची व संसारोपयोगी वस्तूंची मदत

मनमाड शहरामध्ये रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शहरातील रामगुळणा नदीला मोठ्या...

read more
.