loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडिओ) मनमाडला भाजपा सरकारच्या विरोधात मोर्चा

बिलकीस बानो बलात्कार प्रकरण तसेच राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाण प्रकरणात...

read more
अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रा : इंदोरच्या लक्ष्मण नामदेव गणवीर यांची ३५ वी शिर्डी वारी

अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रा : इंदोरच्या लक्ष्मण नामदेव गणवीर यांची ३५ वी शिर्डी वारी

मनमाड - गेल्या पन्नास वर्षापासून अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रेद्वारे देशातील जनतेला मतदान...

read more
मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनंदा झेडें तर उपसरपंचपदी दिपक खैरणार

मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनंदा झेडें तर उपसरपंचपदी दिपक खैरणार

नांदगाव(सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड आज...

read more
आ. सुहास कांदे यांचा निर्धार ;  नांदगाव तालुक्यात लवकरच लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक निर्माण  करणार

आ. सुहास कांदे यांचा निर्धार ; नांदगाव तालुक्यात लवकरच लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक निर्माण करणार

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : शहरात धनगर (मेंढपाळ ) समाज निर्धार मेळाव्यात आ. कांदे यांनी धनगर समाज...

read more
विठ्ठल रखुमाई मंदीरास आ.सुहास अण्णा कांदे यांच्याकडून मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट

विठ्ठल रखुमाई मंदीरास आ.सुहास अण्णा कांदे यांच्याकडून मखरासाठी सव्वा किलो चांदी भेट

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) :नांदगाव शहरातील श्री संत सावता महाराज कंपाऊड येथील विठ्ठल रखुमाई मंदीरास...

read more
भुसावळ विभागातील तब्बल ३६ रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने केल्या रद्द : प्रवाशांत नाराजी

भुसावळ विभागातील तब्बल ३६ रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने केल्या रद्द : प्रवाशांत नाराजी

मनमाड :छत्तीसगडमधील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील बिलासपूर विभागातील इंगुर स्थानक ते रायगड...

read more
.