loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सहकाऱ्यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन !

बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सहकाऱ्यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन !

काल विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहयोगी पक्षांचे सर्व...

read more
उप जिल्हा रुग्णालयातील पीडब्लूडी अंतर्गत असलेली प्रलंबित कामे पूर्ण  करा : शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेची मागणी

उप जिल्हा रुग्णालयातील पीडब्लूडी अंतर्गत असलेली प्रलंबित कामे पूर्ण करा : शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेची मागणी

मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी तसेच युवती सेनेतर्फे दोन दिवसापूर्वी मनमाड उपजिल्हा रुग्णालयास...

read more
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित) मनमाड येथे एकदिवसीय मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित) मनमाड येथे एकदिवसीय मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

मनमाड (योगेश म्हस्के): गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने तसेच श्री नितीन भाऊ मोरे...

read more

(बघा व्हीडीओ) पिसारा फुलवत कातरवाडी शिवारात मोराचा नाच……

मनमाड पासून जवळच असलेल्या कातरवाडी तालुका चांदवड येथील परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र व...

read more
.