loader image
[ays_poll id=7]

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे नम्र आवाहन

Jan 17, 2024


विश्वातील समस्त हिंदू धर्माला गर्व आणि अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 (पौष शु. द्वादशी )रोजी येत आहे 496 वर्षा नंतर मुक्त झालेल्या अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमी वर हिंदू चे आराध्य दैवत प्रभू श्रीराम चंद्र यांचे भव्य मंदिर निर्माण झाले असून मंदिर गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता माता व श्री हनुमान यांचे मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा संपन्न होणार आहे या प्रतिष्ठापनेच्या अत्यंत शुद्ध व पवित्र मुहूर्तावर दिनांक 22/01/2024 रोजी खालील प्रकारे धार्मिक कार्यक्रम करून हा ऐतिहासिक हिंदू गौरव दिन दीपावली स्वरूपात साजरा करावा असे नम्र आवाहन गेल्या 38 वर्षा पासून श्रीराम जन्मभूमी मुक्ती साठी अखंड पणे निःस्वार्थ पणे कार्य करणाऱ्या ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे करण्यात आले आहे.मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदू देव-देवतांची मंदिरे व धार्मिक स्थळांवर उत्स्फूर्तपणे स्वच्छता
अभियान राबविण्यात यावे. / मंदिरांना रंगरंगोटी करण्यात यावी . मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदू धार्मिक स्थळे व मंदिरांवर मोठे भगवे धर्म ध्वज लावण्यात यावे/सर्व मंदिरात देव मुर्तीना नवीन वस्त्र परिधान करावी.
मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदू देवदेवतांच्या मंदिर व धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई (लाईटिंग) करण्यात यावी आणि मंदिरांना फुलांची तोरणे बांधण्यात यावी, भगव्या पताका लावून मंदिर परिसरात विविध प्रकारे सजावट करण्यात यावी.
प्रत्येक हिंदू कुटूंबाने या हिंदू गौरव दिनानिमित्त सोमवार दि. २२/०१/२०२४ रोजी आपले घर , दुकान व इतर वास्तूंसमोर सुशोभित रांगोळी काढावी व तोरणे बांधावी, गुढी उभारावी,तसेच प्रत्येक घरावर व वास्तूवर भगवा धर्मध्वज लावावा/दिपावली उत्सवाप्रमाणे हिंदू बंधु भगिनींनी नववस्त्र परिधान करावे.
दिपावली उत्सवाप्रमाणे दि.२२/०१/२०२४ च्या ५ दिवस आधीपासून सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे व घर दुकान वास्तूवर आकाशकंदिल लावण्यात यावे.
दि.२२/०१/२०२४ रोजी शहरातील सर्व हिंदू मंदिरांमध्ये व धार्मिक स्थळांमध्ये सायंकाळी मोठ्या प्रमाणावर पणत्या लावून दिपोत्सव साजरा करावा तसेच मंदिरांसमोर व घरांसमोर
फटाक्यांची मोठी आतिषबाजी करावी.
दि.२२/०१/२०२४ रोजी प्रत्येक हिंदू कुटूंबामध्ये या ऐतिहासिक शुभदिनानिमित्ताने मिष्ठान्नाचे
(गोड भोजनाचा) नैवेद्य तयार करण्यात यावा.
दि.२२/०१/२०२४ रोजी हिंदू मंदिरे व धार्मिक स्थळांमध्ये सार्वजनिकरित्या गोड अन्नसेवेचा
कार्यक्रम सामुहिकरित्या आयोजित करण्यात यावा.दि.२२/०१/२०२४ रोजी हिंदू मंदिरे व धार्मिक स्थळे व प्रत्येक घरामध्ये भजन, किर्तन, रामकथा गायन, यांचे आयोजन व्हावे. सामुहिक व व्यक्तिगत श्री रामरक्षा व हनुमान चालीसा चे पाठ करण्यात यावे सर्व हिंदू बंधू भगिनीं तसेच सर्व हिंदुत्ववादी पक्ष संघटना, संस्था, मंडळे यांनी या ऐतिहासिक क्षण उत्साह मध्ये साजरा करावा हे नम्र आवाहन ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.