Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

Jan 19, 2024

मनमाड – चेन्नई येथे होणाऱ्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा किशोर व्यवहारे,कृष्णा संजय व्यवहारे मेघा संतोष आहेर, साईराज राजेश परदेशी, यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
२६ ते ३० जानेवारी दरम्यान वेटलिफ्टिंग च्या स्पर्धांचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले असून भारतातील सर्वात मोठा क्रिडा महोत्सव म्हणून या स्पर्धांकडे बघितले जाते
वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २१ खेळाडूंची विविध वजनी गटात निवड करण्यात आली आहे
खेलो इंडिया युथ गेम्स साठी निवड झालेला कृष्णा संजय व्यवहारे हा गूड शेफर्ड्स स्कूलचा विद्यार्थी आहे. आकांक्षा किशोर व्यवहारे, मेघा संतोष आहेर, साईराज राजेश परदेशी हे छत्रे विद्यालयाचे विद्यार्थी आहेत
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका संगीता पोतदार, जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड, डॉ विजय पाटील, डॉ सुनील बागरेचा, प्राचार्य डॉ दत्ता शिंपी, गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू, क्रीडाप्रशिक्षक मनोज देशपांडे, लकी रिसम, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]