loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

Feb 16, 2024


के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
येथील के आर टी हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते नववीच्या मुलींनी सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात केली. सूर्यनमस्कारामध्ये एकूण दहा स्थिती असतात सूर्यनमस्कारामुळे हृदय फुफ्फुस यांचे कार्य वाढते स्नायू बळकट होतात. सर्व महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा होतो.पाठीचा कणा,मणका आणि कंबर लवचिक होते. पचनक्रिया सुधारते. मनाची एकाग्रता वाढते. चरबी कमी होऊन वजन कमी होते. सर्वप्रथम मुलींनी सूर्य नमस्कार केले. सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील ताठरपणा कमी होतो. व आसनासाठी आवश्यक असलेला लवचिकपणा प्राप्त होतो. सूर्यनमस्कार हा सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही वेळी घातले जाऊ शकतात. प्रारंभी सूर्याकडे तोंड करून दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करावी. विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेच्या मैदानावर रथसप्तमी या नावात विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.
रथ सप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.रथसप्तमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा समजला जातो. सूर्यो पासना करणारे रथसप्तमी सूर्यनमस्कार दिन साजरा करतात या दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शक शिक्षक सौ संगीता कदम देसले यांनी प्रात्यक्षिकासह सूर्यनमस्कार घालून दाखवले. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून सांगितले.या दिवसापासून अधिकाधिक लोक सूर्यनमस्काराकडे आकृष्ट होतील व आपले आरोग्य चांगले राखतील यानिमित्त महत्त्वाची संकल्पना राबवली गेली. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता के आर टी शाळेत सूर्यनमस्काराचे आयोजन इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सूर्यनमस्कार पूर्ण केले. त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. सौ स्वाती बिडवे. सौ वैशाली रसाळ. सौ रुपाली निंभोरकर. भारती पवार,शहनाज पठाण,अमिता झाडे क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.