मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योतस्ना , शाळेतील विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. केशव आचार्य सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सि.व्ही. रमण यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कुमारी कीर्ती दराडे हिने केले तर कुमार आर्यन जोगदंड यांने आपल्या भाषणातून विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व सोदाहरण सांगितले. कुमार स्वप्निल सोनवणे यांने विज्ञान गीत सादर करून विज्ञानाचा जागर केला. कुमारी कावेरी वाबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.
मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...