मनमाड : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. अपघात नुकसान भरपाई खटल्यातील मखमलाबाद येथील कै. मयूर बोरसे यांच्या वारसांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.
दोन वर्षापूर्वी कै.मयूर बोरसे यांचा दिंडोरी रोडवर अपघाती मृत्यू झाला होता,या अपघातातील वाहन मालक आणि इन्शुरन्स कंपनी यांच्या विरुध्द कै.बोरसे यांच्या वारसांनी अॅड. हुसेन बी. सैय्यद यांच्या मार्फत अपघातातील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. ३ मार्च २०२४ रविवार रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये हे प्रकरण नाशिक जिल्हा न्यायाधिश श्री.जिवने,श्री.बावस्कर, श्री.इंदुरकर, यांच्या पॅनल समोर प्रकरण निकाली काढण्यात आले.बजाज अलीयांज कंपनीच्या तर्फे अॅड.शरद अष्टपुत्रे, अॅड. संदीप आहेर कंपनीचे लिगल ऑफिसर आकाश महिरे यांच्या वतीने वारसांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

साईराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज...