loader image

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

Mar 13, 2024





नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली जातील असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला.  नांदगाव शहरातील जुने रेल्वेफाटक नं ११३ पासून ते गंगाधरी पर्यंत ची दिड कि.मी. वरील  अतिक्रमणे जमिनदोस्त होणार असल्याने अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले  आहे.

उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकांम विभाग नांदगाव यांनी ७ मार्च २०२४ रोजी अतिक्रमण धारकाना नोटीस बजावून २४ तासाच्या आता अतिक्रमणे काढण्याचे फर्माण केले आहे .
नांदगाव येवला रोडवरील गंगाधरी ते जुना रेल्वेगेट पर्यंत ची अतिक्रमणे काढण्याची नोटीस बजावल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे .चांदवड नांदगाव मनमाड ४० गांव राज्यमार्ग २४ लगत सा.क्र. ०/००ते १:५०० मध्ये रस्त्यालगत डाव्या उजव्या बाजूला असलेली विविध व्यवसायाची दुकाने टपरी अनधिकृतपणे केलेली अतिक्रमणे काढण्या संदर्भात नोटिसा बजावल्याने दि १३ मार्च रोजी सदर अतिक्रमणे काढण्याचे काम चालू होते अतिक्रमण धारक स्व:त ही अतिक्रमणे काढण्याचे चालु केले आहे दरम्यान शहरातील अनेक अतिक्रमणे रस्त्यालगत संपूर्ण शहरात आहे आणी फक्त रेल्वेफाटक ते गंगाधरी याच दरम्यान दिड किमी वरील अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा जाणीव पूर्वक बजावल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर केला आहे.
प्रतिक्रिया : अधिकार्यानी दबावतञ वापरून जबरदस्ती अतिक्रमणे काढली जात आहे २४ तासात खाली करण्याचे सक्तीने बजावले असून शहरात सर्वच रस्त्यावर अतिक्रमणे आहेत फक्त रेल्वेफाटका जवळचीच का  काढ्याचे नोटिसा? शहरात देखील पाय ठेवायला जागा नाही .एखादी विपरीत घटना घडली तर अग्नीशमन दलाची गाडी शहरात जाईल का अग्नीशमन दलाच्या गाडीचे शहरात प्रात्येक्षिक करण्यात यावे :  विश्वास अहिरे माजी नगरसेवक नांदगाव


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू हसन शेख य नंदुरबार जिल्हा अंडर 14 क्रिकेट सामन्यात चमकला

भुमी क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू हसन शेख य नंदुरबार जिल्हा अंडर 14 क्रिकेट सामन्यात चमकला

गुरुवार ४ जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 ( जिल्हास्तरीय )...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालय,उमराणे मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे महाविद्यालय,उमराणे मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुखपदी सतीश परदेशी यांची  निवड

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुखपदी सतीश परदेशी यांची निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या प्रति असलेली निष्ठा सामाजिक कार्याची बांधिलकी व उत्तम...

read more
बघा व्हिडिओ – प्रभु श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड याच्या पुतळ्याचे मनमाड शिवसेनेतर्फे दहन

बघा व्हिडिओ – प्रभु श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड याच्या पुतळ्याचे मनमाड शिवसेनेतर्फे दहन

सकल हिंदु समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या राजकीय...

read more
.