loader image

भीमोत्सव २४ उत्सवामध्ये प्रबोधनात्मक – सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Mar 18, 2024


मनमाड – शहरातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती, संघटना, संस्थांनी एकत्र येत भीमोत्सव २०२४ या प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांची रेलचेल असलेला सात दिवसांचा उत्सव साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे पावती पुस्तकेला, वर्गणी गोळा करण्याला फाटा देत उपस्थितांनी स्वतः पैसे जमा केले. यामुळे जयंती उत्सवात हा उपक्रम आदर्श ठरणार आहे.

मनमाड शहरात साजरा होणारा जयंती उत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे. उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात. एक विचारात्मक चळवळ उभी रहावी यासाठी शहरातील फुले, शाहू, आंबेडकरांना मानणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांनी एकत्र येत येथील इंडियन हायस्कूलच्या सभागृहात बैठक घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘भीमोत्सव २०२४’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले. यावेळी भीमोत्सव आयोजन समितीचे आयोजक तथा कोषाध्यक्ष अमोल खरे यांनी मागील २०२३ वर्षीचा हिशोब अहवाल सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. उपस्थितांनी स्वइच्छेने स्वतः पैसे जाहीर केले तर अनेकांनी पैसे देण्याचे कबूल केल्याने एक नवा पायंडा पडला आहे. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. या भीमोत्सवात विचारवंतांची व्याख्याने, शाहिरी, जलसा, भीमगीते, स्पर्धा आदींसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. या बैठकीत अध्यक्ष अथवा कार्यकारणी न निवडण्याचा मागील निर्णय याही पुढे कायम करण्यात आला. यावेळी भीमोत्सव समितीचे आयोजक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, निलेश वाघ, संजय कटारे, पापा थॉमस, प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे भीमा महिरे, फिरोज शेख, प्रवीण गरुड, रामदास पगारे, नरेन संसारे, राकेश कोल्हे, अशोक पाईक, दीपक केदारे, रामा निकम, अनिल शेजवळ, शरद घुसळे, पंकज जाधव, अमीन शेख, प्रदीप गायकवाड, वंदेश गांगुर्डे, संजय भालेराव, बाळासाहेब मोरे, जावेद शेख, सद्दाम अत्तार, सुरेश अहिरे, अर्जुन साळवे, दिनकर अहिरे, दादाभाऊ शार्दुल, विक्रम सुरवसे, सुनील साळवे, अशोक बिदरी, पप्पू परब, पांडुरंग पगारे, दयानंद घोडके, बाळासाहेब भोसले, गणेश अंकुश, दीपक गायकवाड, अक्षय जाधव, अशोक जगधणे, राहुल दाणी, गिरीश देवरे, विशाल साळवे, आदींसह मोठ्या संख्येने आंबेडकरी विचारांचे नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
.