loader image

मनमाड महाविद्यालयात मतदान जनजागृती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Apr 19, 2024

मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा या स्पर्धांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदाराचे कर्तव्य, अधिकार तसेच मतदान केल्याने भारताची लोकशाही अधिक दृढ होईल असे प्रतिपादन केले. रांगोळी स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून रांगोळी व मेहंदी स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व सांगितले.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, श्रीमती सुरेखा राजवळ, श्रीमती योगिता शिंदे, सौ शितल हिरे, श्रीमती सुरेखा निकम, महाविद्यालयातील शिक्षक यांनी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
.