loader image

मनमाड शहरात २२ एप्रिल पासून फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स

Apr 19, 2024


मनमाड – फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून दि. २२/०४/२०२४ पासून सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत ३५ दिवसांच्या कालावधीसाठी इंग्लिश स्पिकींगचा कोर्स सुरू होत आहे.

फिनिक्स स्पोकन इंग्लिश या कोर्सचे २३ व्या वर्षात पदार्पण होत असून आत्तापर्यंत अनेक शहरी, ग्रामिण तसेच सर्व माध्यमाच्या असंख्य विदयार्थ्यांनी अनुभवलेला व १००% निकालाची परंपरा कायम असणारा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये विदयार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या चारही कौशल्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने व अत्याधुनिक साधनांचा वापर करून आनंददायी शिक्षण या पध्दतीने मार्गदर्शन केले जाते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास व सभाधीटपणा निर्माण केला जातो. त्यामुळे विदयार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भिती कायमस्वरूपी घालविण्यास मदत होते. कोर्सच्या या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे मनमाडच्या पंचक्रोशीत कोर्सचा नावलौकिक वाढलेला आहे. तसेच पालकांसाठी इंग्रजी विषयाची खात्रीशीर तयार करून घेणारा क्लास म्हणून प्रथम पसंतीचा विश्वास संपादन केलेला आहे.

सदर कोर्स विदयार्थी, शिक्षक व घरी विदयार्थ्यांचा अभ्यास घेणा-या पालकांसाठी तसेच विविध स्पर्धापरिक्षांची तयारी करणा-या विदयार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोर्समध्ये शिकवलेल्या प्रत्येक भागाचे मुल्यमापन वेळोवेळी केले जाते. तसेच शेवटच्या दिवशी पालकांसमक्ष विदयार्थ्यांच्या इंग्लिश स्पिकींगची क्षमता तपासण्याकरीता डेमो ठेवला जातो तसेच कोर्ससाठी लागणारे आवश्यक साहित्य जसे पुस्तक, वही, पेन सर्व टेस्टचे साहित्य कोर्स फीमध्ये विदयार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. कोर्सचे यशस्वी संचलन करण्यासाठी कु. अमिता झाडे तसेच श्री. राम महाले, श्री. राजेश सोनवणे, श्री. प्रविण आहेर, श्री. प्रदिप संसारे, सौ. गौरी जोशी, सौ. राजश्री बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

नांवनोंदणी केलेल्या सर्व विदयार्थ्यांनी व यावर्षी कोर्स करण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत हजर रहावे असे आवाहन फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्सचे संचालक श्री. मुकेश मिसर यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

चांदवड येथे संपूर्ण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निषेध सभा

चांदवड येथे संपूर्ण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निषेध सभा

चांदवड - येथे महाविकास आघाडी तर्फे चांदवड मुंबई आग्रा महामार्ग चौफुली येथे पवारांची नुकतीच निषेध...

read more
पंचायत समिती प्रशासना विरोधात रास्ता रोको – १२ दिवसांपासून सुरू असलेल्या  मंगळणे गावाच्या उपोषणकर्यांच्या  मागण्या अद्याप दुर्लक्षित

पंचायत समिती प्रशासना विरोधात रास्ता रोको – १२ दिवसांपासून सुरू असलेल्या मंगळणे गावाच्या उपोषणकर्यांच्या मागण्या अद्याप दुर्लक्षित

नांदगाव : मारुती जगधने मंगळणे गांव च्या ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी मागील करणार्या ग्रांमपंचायत...

read more
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी चार सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदके

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी चार सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदके

कृष्णा व्यवहारे मेघा आहेर श्रावणी पुरंदरे साईराज परदेशी यांनी पटकावले सुवर्णपदक क्रीडा व युवक सेवा...

read more
तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविणारे संकट मोचन आमदार सुहास अण्णा कांदे – योगेश (बबलू) पाटील

तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविणारे संकट मोचन आमदार सुहास अण्णा कांदे – योगेश (बबलू) पाटील

तालुक्यात गेल्या काही दिवसात जाणवणारा दुष्काळी रूपाने अस्मानी संकट असतानाच पुन्हा काही...

read more
.