मनमाड – भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात गेल्या 20 वर्षा पासून निःस्वार्थ रुग्ण सेवा करणाऱ्या आनंद सेवा केंद्रा तर्फे परिपूर्ण जैन तत्वज्ञान सांगणारा आणि जैनाचार्य पूज्य श्री अमोलक ऋषीजी महाराज लिखित जैन तत्व प्रकाश हा दुर्मिळ ग्रंथ मनमाड सार्वजनिक वाचनालयास दोन प्रतीत भेट देण्यात आला मनमाड सार्वजनिक वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी मनमाड जैन श्रावक संघाचे संघपती रिखबशेठ ललवाणी होते तर प्रमुख अतिथी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, संचालक प्रज्ञेश खांदाट जेष्ठ संचालक नरेशभाई गुजराथी प्रगती अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाषकाका संकलेचा नामको बँकेचे संचालक सुभाषभाऊ नहार जेष्ठ व्यापारी पोपटशेठ बेदमुथा प्रगती बँकेचे संचालक नविनभाऊ शिंगी विश्वस्त संजय ललवाणी पियुष सुराणा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी प्रास्ताविक मनोगता मध्ये मनमाड सार्वजनिक वाचनालया मध्ये सर्व धर्माची,पंथाची पुस्तके आहेत “जैन तत्व प्रकाश” या दुर्मिळ जैन तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथाची भर यात पडली आहे वाचकां याचा लाभ घ्यावा असे सांगत ग्रंथ भेटी बद्दल आनंद सेवा केंदा चे ऋण व्यक्त केले. आनंद सेवा केंद्रा चे कल्पेश बेदमुथा यांनी ग्रंथ भेटीची संकल्पना व्यक्त करीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आनंद सेवा केंद्राने मनमाड शहरात आरोग्य व रुग्ण सेवा कार्यात उल्लेखनीय कार्य केले आहे त्याच बरोबर त्यांनी आज धार्मिक कार्यात जैन तत्वज्ञाना चा ग्रंथ रुपी प्रसार कार्य करण्याचा शुभारंभ या ग्रंथ भेटी ने केला आहे हे कौतुकास्पद आहे असे आपले मनोगत मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष संघपती रिखबशेठ ललवाणी यांनी सांगितले पोपट बेदमुथा सुभाष संकलेचा या उभयतांनी या ग्रंथाच्या प्रत्येकी 10 प्रति इतर ग्रंथालयांना देणे साठी आनंद सेवा केंद्रास देण्याचे जाहीर केले तर सुभाष नहार,मनोज बाफना, पोपट बेदमुथा, सुरेश लोढा, डॉ नितीन जैन आदीनी आपले शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अमृत नागरी पतसंस्थेचे चेअरमन कांतीलाल लुणावत,डॉ सुनील बागरेचा, भिकचंद नाबेडा सर, संदीप देशपांडे, आनंद सेवा केंद्राचे योगेश भंडारी, चेतन संकलेचा, राकेश ललवाणी, ऍडव्होकेट संजय गांधी, संकेत बरडिया, विशाल लुणावत, दिपक शर्मा अंकुर लुणावत, अमोल देव, नितीन आहेरराव, विनय सोनवणे, ललित धांदल अनुप पांडे मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी मच्छिन्द्र साळी आदी प्रमुख मान्यवरा सह वाचक मोठ्ठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा आनंद सेवा केंद्रा चे योगेश भंडारी यांनी केले.