loader image

आनंद सेवा केंद्र,टिम केट व व्यापारी महासंघा तर्फे मतदान जनजागृती अभियान

May 19, 2024


 

लोकशाहीच्या महोत्सवात आनंद सेवा केंद्राने ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा यासाठी ७ व्हीलचेअर ची सेवा निवडणूक आयोगाला दिली. आनंद सेवा केंद्राचे काम हे कोतुकास्पद असुन त्यांच्याकडूनच अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे गौरवोद्गार मनमाड निवडणूक प्रमुख व मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी यांनी काढले. सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन व फलकाव्दारे जनजागृती टिम केट, व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले.याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक,आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष
व टिम केटचे महाराष्ट्र सचिव कल्पेश बेदमुथा, ज्येष्ठ व्यापारी गुरूदिपसिंग कांत, आनंद सेवा केंद्राचे उपाध्यक्ष योगेश भंडारी, दिपक शर्मा,अमोल देव, अँड संजय गांधी, विशाल लुणावत,सचिन बेदमुथा,महासंघाचे उपाध्यक्ष कुलदीपसिंग चोटमुरादी, महासंघाचे सरचिटणीस मनोज जंगम,झुजर भारमल,नितीन आहेरराव,विनय सोनवणे, आर्की.हार्दीक बेदमुथा,अंकुर लुणावत,अनुप पांडे, प्रमोद भाबड, ऋषभ शाह, योगेश भडके,नितीन महाजन,गौरव केकाण,हिरामण सोनवणे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
अझहर शेख व नानाभाऊ पाटील यांनी निवडणूक आयोग व मनमाड नगर परिषद तर्फे आनंद सेवा केंद्र व व्यापारी महासंघ,टिम केटचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
.