loader image

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

Jun 14, 2024


मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. दरम्यान, अखेर बळीराजाची प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. तर, पेरणीची पूर्वतयारी पूर्ण झाली आणि पेरणीला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीतही वाढ झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात बियाणे तसेच खतांचा तुटवडा जाणवू नये. तसेच वाढीव दराने कुणीही बियाण्यांची विक्री करू नये. यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात काही विभागात चढ्या दराने बियाणे विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका वाणांचे रेट हे सर्वत्र एकच असावेत व ज्या त्या कंपन्यांनी आपापले दर प्रसिद्ध करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या
यावर मंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांना यावेळी त्यांनी केल्या आहेत. तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या पथकाने सक्रिय होत कुठे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल. तर, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार आहे.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

read more
नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे प्रभु श्रीराम शिकारसाठी...

read more
.