मनमाड – येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली विद्यालय पुष्पहार , व रांगोळीने सजविण्यात आले होते, याप्रसंगी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.देशपांडे सर ,उपमुख्याध्यापक श्री. कोळी सर यांनी याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नव्या शैक्षणिक वर्षाबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...