loader image

मनमाड महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

Jun 21, 2024


येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. योगशास्त्राची निर्मिती प्राचीन काळापासून भारतात झाली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि महात्म्य योगातून समजले. योग केल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. तसेच आनंददायी जीवनासाठी नियमित योगासने करणे लाभदायक आहे, असे प्रतिपादन योगशिक्षिका स्वाती मुळे यांनी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. योगाचे महत्त्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये युनोत विषद केले. त्यानंतर जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी योगाचा स्वीकार केला. दि. २१ जुन २०१५ पासून जागतिक योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला . या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. बी एस देसले , व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य पी.के.बच्छाव, पर्यवेक्षक प्रा रोहित शिंदे,पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फंड, कुलसचिव श्री.समाधान केदारे यांच्या उपस्थितीत योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षण शिबीरास योगशिक्षिका मा. स्वाती मुळे, सहशिक्षिका वर्षा मुळे व सार्थक महाले यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी बी परदेशी प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा.सुहास वराडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट प्रा. प्रकाश बर्डे, क्रीडा संचालक प्रा. महेंद्र वानखेडे यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका , राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.


अजून बातम्या वाचा..

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
.