इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आनंदी विनोद सांगळे हिने ८१किलो वजनी गटात युथ मध्ये चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ८८ किलो क्लीन जर्क असे एकूण १६४ किलो वजन उचलून कांस्यपदक व पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले
भविष्यातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून आनंदीने आपल्या कामगिरीने अतिशय कमी वयात सर्वांचे लक्ष वेधून घेतले
आनंदी सांगळे ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर माजी नगरसेवक बंडू नाना सांगळे सिध्दी क्लासेस चे संचालक डॉ भागवत दराडे भाग्यश्री दराडे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शुक्रवारी मनमाडला शोभायात्रा
श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड, वेदिका ब्राह्मण महिला मंडळ मनमाड तथा हिंदीभाषिक ब्राह्मण संघ मनमाड...