loader image

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

Jul 22, 2024


मनमाड – मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धा संपन्न झाल्या.
मनमाड शहाराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन 110 वर्षाची शतकोत्तर वाटचाल करीत मनमाड शहरात गेल्या 56 वर्षापेक्षा जास्त असणारी आंतर शालेय स्पर्धेची सांस्कृतिक परंपरा टिकवित मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाही स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती निमित्त तथा स्व.अण्णाभाऊ साठे यांचे पुण्यतिथी निमित्ताने या महान लेखकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार दि.21 जुलै 2024 रोजी छत्रे हायस्कूल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. शालेय विद्यार्थ्यांना विविध विषय वाचनाची गोडी लागावी, लिखाणाची गोडी लागावी म्हणून या निबंध स्पर्धेचे आयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सातत्याने 56 वर्षा पेक्षा अधिक काळापासून करण्यात येत आहे. आजच्या समाजव्यवस्थे वर सोशल मीडिया चे मोठे आक्रमण झालेले असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हे आजच्या काळात अतिशय धाडसाचे आहे. तरी देखील या कठीण काळातही मनमाड सार्वजनिक वाचनालय या स्पर्धेचे नियमित पणे आयोजन करुन विद्यार्थ्यांना आपली लेखन कला दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या वतीने आंतर शालेय स्पर्धा आयोजनाचे सातत्य हे मनमाडच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची बाब आहे सध्या संगणक, मोबाईल, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप अशा विद्यार्थ्यांना आकर्षित करणार्‍या सोशल मिडीयाचे वातावरणाचा मोठा प्रभाव असतानाही मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित या निबंध स्पर्धेत 16 पेक्षा जास्त विद्यालयातील 578 पेक्षा जास्त शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनीनी उदंड प्रतिसाद देत उस्फुर्त सहभाग नोंदवला. यंदा मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्पर्धेत सहभागी विध्यार्थ्यांन साठी मी आंतर शालेय स्पर्धेचा स्पर्धक असा सेल्फी फोटो पॉईंट तयार करण्यात आला होता याला विध्यार्थी पालक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत प्रामुख्याने सरस्वती विद्यालय,छत्रे न्यु इंग्लिश स्कुल, मरेमा विद्यालय (इंडियन हायस्कूल) , गुरुगोबिंद सिंह हायस्कूल, के.आर.टी.विद्यालय, गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, केंद्रीय विद्यालय, एच.ए.के.हायस्कूल, बी जी दरगुडे स्कूल,संत बार्णबा हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल,मनोरमा सदन स्वामी विवेकानंद विद्यालय, कांचन सुधा स्कूल,,म वि प्र विद्यालय, इकरा हायस्कूल,आदी प्रमुख विद्यालयांचा समावेश आहे. या निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 10 दिवस आधी स्पर्धेचे विषय कळविण्यात येतात. 5 वी ते 7 वी छोटा गटतर 8 वी ते 10 वी मोठा गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम 3 क्रमांक व 5 उत्तेजनार्थ अशी दोन्ही गटांना पुस्तकं व प्रमाणपत्र स्वरूपात पारितोषिके तसेच स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर सहभाग प्रमाणपत्र लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल येथे गुरुवार दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 01-00 वाजता संपन्न होणाऱ्या बक्षिस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेचे नियोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, जेष्ठ संचालक नरेश गुजराथी माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी यांनी केले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय सानप, चेतन सुतार सर,मंगेश वाणी सर,सौ साळुंखे मॅडम,ऍड संजय गांधी,अभिषेक पितृभक्त , सिद्धेश परब, प्रकाश धामणस्कर आदी मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले. या स्पर्धेचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी ,हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी मच्छिन्द्र साळी आदींनी केले.


अजून बातम्या वाचा..

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.