महात्मा गांधी विद्यामंदिर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, मराठी विभागा अंतर्गत, जयवंत दळवी यांच्या जन्मदिनाच्या औचित्य सादून, “स्वर कवितेचा” या का यबाबतर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम व उपप्राचार्य प्रा. डॉ. बी.एस.देसले यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी एफ. वाय. बी. ए .च्या वर्गातील पुढील विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले रुपेश सरोदे, ज्ञानेश्वर धोंडे, किरण गुंड, कोमल झाल्टे. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक. डॉ.बी.व्ही. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना. आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचा जास्त उपयोग न करता कविता, कथा, कादंबरी यांचे वाचन करून आपली ज्ञानसाधना वाढवावी, आपले कुटुंब समाज व देश यांच्या उन्नतीसाठी, प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन केले. हिंदी विभागातील
डॉ. व्ही.जी.राठोड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना. विद्यार्थ्यांनी स्वः कविता, कथा यांचे लेखन करून त्याचे अभिवाचन करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढावी, यासाठी सतत वाचन, चिंतन,मनन याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभागातील प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शांताराम (आप्पा) त्र्यंबक खरे यांचे निधन
मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांचे चुलते जेष्ठ सामाजिक...