loader image

जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षकदिन साजरा

Sep 5, 2024


नांदगांव : दिनांक. 5 सप्टेंबर रोजी नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. तो अत्यंत नेटकेपणाने पार पडला . शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले. शाळेच्या प्रांगणात समारंभ आयोजित करण्यात आला.स्कूलचे प्राचार्य मणी चावला तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक माटाडे व गुण कवडे यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्व.किशोर बागले यांच्या आठवणींना शब्दसुमनानी उजाळा दिला. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. सुनिलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये ओळखा पाहू तसेच विविध संगीतमय खेळांचे आयोजन करण्यात आले होते.या खेळांमध्ये विजयी झालेल्या शिक्षकांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांना दहावीच्या विद्यार्थ्यांनी भेटवस्तू दिल्या. यावेळी शिक्षकांना वेगवेगळे अॅवार्ड देऊन गौरविण्यात आले.प्रत्येक शिक्षकास एक डायरी भेटवस्तू म्हणून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नववीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्याच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांची सुंदर अशी ओळख करून दिली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे आणणारा कोलकत्ता येथे झालेल्या रेप केसवरती सुंदर अशी प्रबोधनपर नाटिका सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षिकांना संस्थेचे चेअरमन कासलीवाल, तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, सौ.प्रमिलाताई कासलीवाल, सुशिल कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, प्रिन्सिपल मनी चावला ,मुख्याध्यापक शरद पवार,विशाल सावंत,गोरख डफाळ यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी वैष्णवी पाटील व रसिका मेडतिया यांनी तर आभार रिजवान मनसुरी यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.