loader image

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

Sep 18, 2024


मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन महामिरवणुक लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवत पारंपारिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक ढोल ताशा च्या गजरात संपन्न झाली. आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीदवाक्य घेवून श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 1997 पासून यंदा सलग 28 व्या वर्षी या महामिरवणुकीचे सकाळी आयोजन करण्यात आले होते. यंदा मनमाड शहर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री शेषराव चौधरी यांनी सपत्नीक श्री निलमणी मंदिरात महाआरती करून या पालखी मिरवणुकीचा शुभारंभाचा नारळ वाढविला . या जल्लोष पूर्ण मिरवणुकीमध्ये मिरवणूक मार्गावर आकर्षक सुशोभित रांगोळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथकाने पालखी पुढे लोककला सादर केळी मिरवणुकीची शिवकालीन दवंडी देण्यात आली ,वाद्यवृंद (बॅण्ड), सनई चौघडा, घोडे व उंटस्वार युवती, पारंपारिक वेशात श्री ढोल पथक मनमाड यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वादनाची सादर केलेली विविध प्रात्यक्षिके संपूर्ण मिरवणुकीत लक्षवेधी ठरली आणि मानाच्या पालखी समोर चंद्र सूर्य, (मानाची अब्दागिरी ) भगवा ध्वज,आणि सुगंधीत फुलांनी सजवलेली श्री निलमणीच्या पार्थिव मुर्तीची सुशोभित फुलानी सजवलेली पालखी, ही यंदाच्या मिरवणुकीची विशेष आकर्षणे ठरली. श्री निलमणीच्या पालखीजवळ शंखनादाने श्री गणेशाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला. . तर मिरवणुकीत सर्व भाविकांना खडीसाखरेचा व मोदकाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या श्री निलमणीच्या पालखीतील पार्थिव मूर्ती ला मिरवणुक मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी औक्षण /आरती केली या श्री निलमणीच्या महामिरवणुकीचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्‍वस्त अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट,नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी यांनी केले. तर या मिरवणुकीत श्री निलमणी गणेश मंडळाचे रामदास इप्पर, भरत छाबडा, संतोष बळीद, नाना शिंदे शिवाजी सानप, दीपक शिंदे, अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त ,राहुल लांबोळे,रितीक चव्हाण, क्रांती आव्हाड,मच्छीद्र साळी, मनोज छाबडा, योगेश म्हस्के,रोहित कुलकर्णी,अक्षय छाबडा, ,दिक्षा पांगुळ, ऐश्‍वर्या जोशी, प्रणव ललवाणी, राजेश निकुंभ, उपेंद्र पाठक, महेश बोराडे,सचिन व्यवहारे , आदी प्रमुखांसह श्री गणेश भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य चौकात श्री निलमणी च्या पालखी वर जोरदार पुष्पवृष्टी केली. या पालखी मिरवणूकीत मोठ्या संख्येने महिला, युवक युवती आबाल वृद्ध सहभागी झाले या पारंपरिक मिरवणुकीस पहाणे साठी शहरातील नागरिकांनी मिरवणूक मार्गावर दूतर्फा मोठी गर्दी केली होती मनमाड शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शना मध्ये या पालखी मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळा तर्फे या पालखी मिरवणुकीचे संयोजन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
.