loader image

नांदगांव येथे मराठा आरक्षणासाठी उपोषन सुरूच

Sep 24, 2024


नांदगांव : मारुती जगधने
मनोज जरांगे पाटील यांना उपोषनाची साथ देत नांदगांव येथे साकळी उपोषन सुरु आहे या साकळी उपोषनाला सात दिवस झाले पण शासन स्तरावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे हे उपोषन अद्याप सुरूच आहे आम्ही आमच्या मागण्या घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार करीत मराठा आंदोलकांनी आपले उपोषन सुरूच ठेवले आहे .
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने काही मुख्य मागण्या मांडल्या आहेत. त्या मागण्या सामान्यतः खालीलप्रमाणे आहेत:
1. शैक्षणिक आरक्षण: मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि शैक्षणिक संधींमध्ये सुलभता मिळेल.
2. नोकरीत आरक्षण: सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधींमध्ये समानता मिळू शकेल.
3. इतर मागासवर्ग (OBC) मध्ये समावेश: मराठा समाजाला ओबीसी (OBC) वर्गात समाविष्ट करून त्यांना त्या वर्गाच्या फायद्यांमध्ये सहभाग मिळावा.
4. अर्थसाहाय्य योजना: शेतकरी मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीच्या सुधारणेसाठी आर्थिक साहाय्य आणि कर्जमाफीसारख्या योजना लागू कराव्यात.
5. शैक्षणिक शुल्क माफी: उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफी लागू करावी.
6. कृषी विकास योजना: शेतकरी वर्गातील मराठा समाजाला विशेष कृषी विकास योजना आणि आर्थिक मदत मिळावी.तसेच समाजातील सगे-सोयरे यांना देखिल सवलत मिळावी.
7. कायदेशीर संरक्षण: मराठा समाजाच्या हक्कांसाठी विशेष कायदे आणि संरक्षण दिले जावे.
या मागण्या मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक स्थितीच्या उन्नतीसाठी मांडल्या जात आहेत.
नांदगांव येथील उपोषनस्थळी मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी
विशाल वडगुले, भास्कर झाल्टे,विष्णु चव्हाण,प्रकाश जगताप,भिमराज लोखंडे,निवृत्ती खालकर हे साकळी उपोषनाला बसले आहे .
अक्रोश आत्मक्लेश मोर्चा होऊनही हे आंदोलक न थांबता आपल्या उपोषनावर ठाम आहेत .बघुया आता मराठा आरक्षणावर शासन प्रशासन काय निर्णय घेत ते या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.