यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट सौं.निकम आम्रपाली ,शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम, माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर जोत्स्ना,माननीय पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पोस्को (posco ) कायद्यातील तरतुदी व स्त्री संरक्षण याबाबत सौ निकम यांनी उपस्थित मुलींना व माता पालकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. वासंती देवरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. एलिझाबेथ शेल्टे यांनी करून दिला. सौ निकम मॅडम यांचा सत्कार शाळेचे माननीय मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापिका यांच्या हस्ते करण्यात आला तर आभार प्रदर्शन सौ ज्योती वाघ यांनी केले. कु. सोनवणे पलक हिने आई या विषयावर सुमधुर आवाजात गीत सादर करून सगळ्यांना भाव विभोर केले तर कु. स्वामिनी कातकडे हिने वक्तृत्वातून आईचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम यांनीही उपस्थित माता पालकांना मार्गदर्शन केले.

गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा – प्रवाशी संघटनेची मागणी
गोदावरी एक्सप्रेस व मनमाड इगतपुरी शटल सेवा मनमाड वरून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी व मनमाड,...