नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यालयातील तब्बल 400 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आकाश कंदील बनवले आहे. भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त प्राचार्य. मनी चावला यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणारे कौशल्य विकसित व्हावे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. या हेतूने शाळेत आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून आकर्षक व पर्यावरण पूरक असे आकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात कार्यशाळेत सहभागी झाले होते. त्यामुळे शाळेत मुलांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून माफक खर्चामध्ये व कमी वेळेत सुंदर व आकर्षक आकाश कंदील तयार केले असून विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकाश कंदील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या घरावर तसेच आपला क्लास रूम दिवाळीच्या सणासाठी लावून सुशोभित करता येणार आहे. कार्यशाळेसाठी शाळेतील चित्रकला शिक्षक श्री निलेश पाटील प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, रिखबकाका कासलीवाल, जिगोलकिशोर अग्रवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल, तसेच प्राचार्य मनी चावला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.
नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...