loader image

श्री.अविनाश छाया अनंतराव पारखे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Apr 12, 2025


मनमाड -येथील सेंट झेवियर्स हायस्कूल मधील वरिष्ठ लिपीक श्री. अविनाश पारखे यांना नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या (NDST&NTECCS)वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री अविनाश पारखे सर हे मनमाडच्या लायन्स क्लबचे माजी सेक्रेटरी असून अजिंक्य एज्युकेशन अँड करियर कौन्सिलिंग सेंटरचे संस्थापक संचालक आहेत.
नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात मा.शांताराम देवरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळ्यात,
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.खासदार भास्करराव भगरे सर, कृषिमंत्री मा. माणिकराव कोकाटे, मा.नामदार श्री.दादासाहेब भुसे, यांच्या हस्ते श्री .पारखे सरांचा शाल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या सत्काराबद्दल शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम, मा. उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,मा. पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर ,फादर लॉईड, फादर विवेक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री. अविनाश पारखे सरांचे अभिनंदन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.