loader image

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

Apr 30, 2025


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या मुकुंद आहेर व साईराज परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा जिल्हास्तरीय थेट गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर करण्यात आला असून
१ मे २०२५ रोजी पालकमंत्री यांचे हस्ते शासकीय कार्यक्रमात पोलिस परेड ग्राउंड नाशिक येथे गौरविण्यात येणार आहे.
स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख दहा हजार असे पुरस्काराचे स्वरूप असून गत दोन वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत मुकुंद व साईराज यांनी पदक पटकावले आहे याच कामगिरीच्या जोरावर जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.