1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन मुंबई व गुजरात ही दोन राज्य तयार झाली. हा दिवस मराठी भाषिक लोकांच्या अस्मितेचा व अभिमानाचा दिवस आहे.
तसेच 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा होतो. कामगारांचा सन्मान,एकता, आणि त्यांच्या अधिकारांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.
शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून महाराष्ट्राच्या तमाम मराठी भाषिकांना तसेच कामगार वर्गास महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
– फलक रेखाटन- देव हिरे. ( कलाशिक्षक , शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)