“मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे.”
नांदगाव येथील आमदार निवासस्थानी मनमाड नगरपालिकेतील सिटू कामगार संघटनेसह रिपब्लिकन फेडरेशन अखिल भारतीय सफाई काँग्रेस मुनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अनेक पदाधिकारी व सदस्यांनी महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत माननीय आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्य कार्यकारणी सरचिटणीस माननीय फरहान(दादा) खान, माननीय अंजुमताई कांदे, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
सिटू संघटनेचे अध्यक्ष संतोष वानखेडे, सुरज चावरिया रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष मटरू चुनियन, सफाई काँग्रेसचे अध्यक्ष संजय बहोत, मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे आनंद आवटी, सफाई मुकदम मिथुन दिगान, मलेरिया विभाग रोहित शिंदे, कैलास जाधव, आशा सेविका मोहिनी मैध, मोहिनी वाघ यांच्या नेतृत्वात अनेक कामगारांनी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी सर्व प्रवेश केलेल्या कामगारांच्या वतीने संतोष वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करत अनेक कामगारांचे प्रश्न व अडचणी मांडल्या तसेच कामगार विकास सेनेचे सल्लागार किरण अहिरे, तालुका अध्यक्ष विलास हुकिरे, मनमाड शाखा अध्यक्ष किशोर अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कामगारांच्या विविध प्रश्नांवर माननीय अंजुमताई कांदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत सर्व कामगारांचे शिवसेना परिवारात स्वागत केले.
माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना नगरपालिकेच्या सर्व कामगारांसह इतर कामगारांना व नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार असून १० लक्ष पर्यंतचे शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले तसेच मनमाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महिन्याचे वेतन अनुदान राखीव ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनास तात्काळ तरतुदीसाठी आदेश दिले मनमाड शहर हे कामगार वस्तीचे शहर असल्यामुळे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड शहरात पहिली कामगार परिषद घेतल्याचे स्मरण ठेवून मनमाड शहरात कामगारांसाठी भव्य दिव्य असे कामगार भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे असे जाहीर केले त्यामुळे आजच्या कामगार सोहळ्यात कामगारांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली आहे.
कार्यकर्माचे सूत्रसंचालन प्रस्तावना कामगार नेते निलेश सपकाळे यांनी केले.
लवकरच इतर विभागातील विविध क्षेत्रातील कर्मचारी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेत व महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत प्रवेश करण्यात करणार आहेत असे त्यांनी सांगितले
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, माजी नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील, वाल्मीक आप्पा आंधळे, सुभाष माळवतकर व अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश सपकाळे यांनी केले याप्रसंगी मनमाड नगरपालिकेची यावर्षी चांगली वसुली झाल्याबद्दल कर निरीक्षक मनोज मगर, आनंद आवटी यांचा सत्कार करण्यात आला.