loader image

श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा प्रारंभ

May 13, 2025


 

नांदगाव ः मारुती जगधने

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 13 /5 /25 रोजी पासून श्री संत ज्ञानेश्वरी माऊली मंदिर नांदगाव येथे प्रारंभ झाला आहे हा सोहळा 7 दिवस अखंडपणे सुरू राहणार आहे या सोहळ्यामध्ये गजर कीर्तनाचा तसेच प्रवचन आणि अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिन हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 रोजी या सोहळ्याचे नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अनिल आहेर उपस्थित होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की संत ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे हे नांदगावचे भूषण आहे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणे हे मोठे भाग्याचे असते या अखंड हरिनाम सप्ताहासाठी कष्ट घेतले त्या नामवंतांचे आपण नामस्मरण देखील केले पाहिजे असे मत आमदार अहिर यांनी व्यक्त करत या सोहळ्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी पालिका मुख्याधिकारी शामकांत जाधव ,माजी सभापती सतीश बोरसे, सुभाष कवडे, चंद्रशेखर कवडे, बाजार समिती संचालक पगार गुरुजी ,ज्येष्ठ पत्रकार मारुती जगधने, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, सुलाने बंधू, भास्कर शेवाळे, उत्तमराव शिंदे ,डॉक्टर चंद्रभान काकळीज ,रामभाऊ पारक, उदय काकळीज, आत्माराम जेजुरकर, विश्वनाथ जेजुरकर,कुणाल देशमुख, बाळासाहेब बोरसे ,रंगनाथ चव्हाण ,धनराज गायकवाड, आत्माराम पाटील ,रामदास खैरनार ,संजय कलत्री ,अरविंद पाटील, सत्यनारायण शर्मा, अशोक सूर्यवंशी ,निर्मलाबाई चव्हाण ,तेजस बाविस्कर, सुरेश पवारआदी नामवंत उपस्थित होते ,
. सदर अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी 50 बाल या अखंड नारायण हरिनाम करण्यासाठी बसलेले आहे तसेच शेकडो महिला व पुरुष देखील या सोहळ्याला उपस्थित झाले होते. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर माऊली उत्सव समितीच्या वतीने उपस्थित यांचे स्वागत केले, यावेळी विविध धार्मिक पूजन करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला गत सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन सोहळ्याप्रसंगी करण्यात आले आहे, गेल्या 35 वर्षापासून हा सोहळा अखंडपणे नांदगाव नगरीमध्ये साजरा होत आहे या सोहळ्यामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन दैनंदिन सात दिवस होणार आहे. दिनांक 13 /5 /2025 ते दिनांक 19 /5/ 25 पर्यंत या सोहळ्याचे आयोजन अखंडपणे करण्यात आलेले आहे ,या सोहळ्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान पारायण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह साठी समितीचे अध्यक्ष दिनकर विसपुते, सेक्रेटरी कुणाल देशमुख ,खजिनदार आत्माराम खैरनार ,विश्वस्त रत्नाकर खरोटे, राहुल परदेशी, धनराज गायकवाड ,जगदीश कलत्री, आदींचे विशेष योगदान लाभलेले आहे कार्यक्रम प्रसंगी पारायण कार्यकारणी समिती प्रचार समिती स्वागत समिती, कीर्तन प्रवचन समिती, भोजन समिती, मंडप समिती ,स्वच्छता समिती= आदी चे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला आमदार सुहास कांदे पोलीस निरीक्षक नांदगाव तहसीलदार नांदगाव गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी नांदगाव आणि अभियंता महावितरण कंपनी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
.