मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११ वी साठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू करण्यात आले असून महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांची टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. इयत्ता ११वी साठी प्रत्यक्ष ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विद्यार्थ्यांनी इच्छुक असलेल्या शाखेमध्ये पहिल्याच फेरीमध्ये प्रवेश कसा निश्चित होईल याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या समस्येचे निराकरण करून आपला प्रवेश फॉर्म बिनचूक पद्धतीने भरण्यासाठी सदर प्राध्यापकांची टीम महाविद्यालयात कार्यरत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्याला येणाऱ्या समस्या तसेच मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे यांनी केले.
प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश समिती महाविद्यालय यांचेशी संपर्क साधावा
1) श्री. कातकाडे डी.आर. (विज्ञान शाखा) ९७६६२११८३२
2) श्री. दासनूर व्ही.ए. (कला शाखा) ७५८८२७७५७१
3) श्री. सातपुते व्ही,आर. (कला शाखा ) ९८८१२६२८२०
4) श्री. ठाकोर सी.डी. (वाणिज्य शाखा) ९७८८३१९८१८

राशी भविष्य : २२ मे २०२५ – गुरुवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....