loader image

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

Jun 17, 2025


 

मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड येथे प्रथमच एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. मा.नगराध्यक्ष मा.राजाभाऊ पगारे व मनमाड शिवसेना युवा शहर प्रमुख आसिफभाई शेख यांच्या शुभ हस्ते स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. स्पर्धेत मनमाड च्या चार संघानी तसेच मालेगाव,नांदगाव, येवला, कोपरगाव येथून पाच नामवंत संघ असे एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेचे पहिले पारितोषिक स्नेहल पांडे, गोलू संकलेचा, सचिन कराड यांच्यातर्फे रु. 10000/- व द्वितीय पारितोषिक मजीद दादा शेख यांच्या तर्फे रु. 5000/- देण्यात आले होते. तसेच स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघास रवीभाऊ निकम (सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता) व मोनीषभाऊ चाबूकस्वार (समाज सेवक) यांच्या तर्फे स्व.रफिकभाई शेख (मा.नगरसेवक) यांच्या स्मरणार्थ आकर्षक,लक्षवेधी चषक देण्यात आले. तसेच स्पर्धेतील मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार सेवनटी सेवनटी प्रॉडक्ट चे आकर्षक टी-शर्ट देण्यात आले. विशेष म्हणजे मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना नाश्ता ची व्यवस्था करण्यात आली होती.स्पर्धेचा अंतिम सामना महामानव फॉउंडेशन,मालेगाव विरुद्ध एम.एस.इलेव्हन,मनमाड संघामध्ये झाला.हा सामना महामानव फॉउंडेशन, मालेगाव संघाने जिंकून प्रथम पारितोषिक रु. 10000/-व आकर्षक चषकाचा मानकरी ठरला.तसेच उपविजेता एम.एस.इलेव्हन,मनमाड संघास रु. 5000/- व आकर्षक चषक देण्यात आले.तसेच एम. एस.इलेव्हन संघाचा कर्णधार मन्सूफ शाह (मनमाड चा टायगर ) यास मालिकावीर पुरस्कार व नांदगाव संघाचा कर्णधार वैभव जाधव यास उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार तसेच महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघाचा खेळाडू कामरान यास उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार देण्यात आले. सामने पाहण्यासाठी मनमाड शिवसेना प्रमुख मयुरभाऊ बोरसे,मा.नगराध्यक्ष साईनाथभाऊ गिडगे, मा. नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील, फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्याध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड चे नाशिक जिल्हा समन्वयक फिरोजभाई शेख,समाजसेवक मजीदभाई शेख, रवीभाऊ निकम(सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता) मोनीष भाऊ चाबुकस्वार(समाज सेवक), हबीबभाई शेख (HB),पंकज भाऊ खताळ,डॉ.सुनिल बिडगर,गणेश इंनुल्लू, रेल्वे सिनियर इन्सिट्यूट, मनमाड चे नविन पदाधिकारी, किशोरभाऊ व्यवहारे,महामानव फॉउंडेशन क्रिकेट संघाचे संघमालक आकाश बेडके तसेच मनमाड शहरातील क्रीडा प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले.मालेगाव येथून आलेले उत्कृष्ट समालोचक शुभम आहिरे यांनी सर्व सामन्यांचे आपल्या गोड आवाजाने समालोचन करुन उपस्थितांची मने जिंकली.मनमाड क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,उपाध्यक्ष देवेंद्र चुनियांन, कैफ शेख यांनीही समालोचन करुन त्यांना साथ दिली. पंचांचे काम शाहीदभाई शेख,आमिर (अव्वा ) खान तसेच ऑनलाईन स्कोररचे काम अबू सुफियान, कैफ शेख, ओंकार ठोंबरे यांनी पाहिले.एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड चे संचालक मन्सूफ शाह, मनमाड क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर, उपाध्यक्ष देवेंद्र चुनियान,सचिव जाविद मुश्ताक शेख सर यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.सदर स्पर्धेसाठी मनमाड क्रिकेट असोसिएशन चे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
.