loader image

समता ब्लड बँक नाशिकच्या वतीने जागतिक रक्तदाता दिवस उत्साहात साजरा

Jun 18, 2025


 

रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवाज् हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समता ब्लड बँक मोठे सामाजिक कार्य करीत आहे.
समता ब्लड बँकेच्या वतीने नाशिक येथील आय एम ए हॉल शालिमार येथे जागतिक रक्तदाता दिवस मोठे उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ अंजुमताई सुहास कांदे होत्या. यावेळी नाशिक शहरातील व जिल्ह्यातील नामांकित रक्तपेढी, समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सामाजिक भान ठेवून समर्पित असलेले रक्तदाते तसेच संस्था चालकांचा गौरव करण्यात आला.
15 वर्षांपासून समता ब्लड बँक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. श्री इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली आज चार जिल्ह्यांमध्ये 13 ब्लड बँक सेंटर चालवत असून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात येते.
आदिवासी भागातून सामाजिक उपक्रम या नात्याने थॅलेसेमिया, सिकलसेल हिमोफेलिया आजाराने ग्रस्त 99 मुलांना दत्तक घेतली असून त्यांचा वार्षिक रक्त पुरवठा व शालेय शिक्षणाचा खर्च समता ब्लड बँकेच्या माध्यमातून केला जातो.
समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असलेले आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा वर्षभर तळागाळातील नागरिकांपर्यंत पुरवली जाते, मोफत डोळे तपासणी चष्मे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिल्या जाते, समता ब्लड बँकेच्या माध्यमातून लाखो रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
याप्रसंगी बोलताना सौ.अंजुमताई कांदे यांनी समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही करत असलेल्या सामाजिक सेवेत विविध हॉस्पिटल्स डॉक्टर्स रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या विविध संस्था चालक यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
तसेच डॉ इरफान खान यांनी रक्तदान कॅम्प आयोजित करणाऱ्या सर्वच संस्था चालकांनी असे सहकार्य यापुढेही कायम ठेवावे असे मत व्यक्त केले.
सामाजिक भान ठेवत रक्तदान करणारे रक्तदाता व रक्तदान विषयी जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला


अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.