loader image

बोलठाण येथील प्रतिष्ठित व्यापारी अमित नहार यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

Jun 27, 2025


 

नांदगांव मारुती जगधने
लोकनेते . .आमदार स्व. कन्हैया लालजी नहार यांचे नातू अमित भाऊ नार यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
नांदगाव येथील आमदार निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला, याप्रसंगी पिंपरखेड गिरणा डॅम वडाळी कासारी जातेगाव गोंडेगाव कासारी तांडा येथील शेकडो प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते,
याप्रसंगी प्रवेश शिवसेनेत करणाऱ्यांमध्ये मध्ये बोलठाण येथून . पस माजी सदस्य राजेंद्र नहार, अमित नहार,शिवराम पोकळे प्रदीप नवले योगेश रिंडे सहज शेकडो कार्यकर्ते, कासारी तांडा येथील रमेश राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नामदेव राठोड, पिंपरखेड येथील सोनू दळवी, पप्पू आहेर ,दादा परदेशी ,युवराज दळवी ,मळगाव समाधान जाधव, गोंडेगाव उत्तम बागुल, रोहिले रवींद्र बागुल ,
सोमनाथ सोनवणे गिरणा डॅम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, तसेच वडाळी येथील चेअरमन चंद्रभान कोरडे ,माजी सरपंच भगवान पवार ,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष राजेश शिवाजी सांगळे, उत्तम बागुल, रवींद्र बागुल, विशाल बागुल, वाल्मीक गायके , राजेंद्र गायके, कल्याण बागुल ,रोहिले बुद्रुक, गोंडेगावचे माजी सरपंच पांडुरंग जाधव ,ज्ञानेश्वर गवळी, समाधान जाधव ,गणेश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार सुहास कांदे यांनी ज्येष्ट नेते बापूसाहेब कवडे यांचे स्वागत करत राजेंद्र नहार व अमित नहार यांचे पक्षात पुष्पगुच्छ हार विशाल स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी अमित नहार तसेच सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी व प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले, शिवसेना हा पक्षच नाही तर एक कुटुंब आहे आणि आज आपण सर्व या कुटुंबाचे सदस्य झाले आहोत आज पासून आम्ही तुमचे तुम्ही आमचे असे त्यांनी मत व्यक्त केले, नहार कुटुंबाणे जसे काँग्रेस सोबत इतके वर्ष राहून कार्य केले त्याच उमेदीने आजपासून शिवसेना पक्षाचे काम कराल ही अपेक्षा ठेवतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित सर्व प्रवेश करताना उद्देशून त्यांनी आपल्याला विकासाकडे जायचं आहे आपल्याला भावी पिढी घडवायची आहे म्हणून आपण एकत्र येऊन काम करू असे आव्हान केले. अमित नहार हे एक शांत संयमी तरुण शिवसेनेत आल्याचा आनंद होत आहे नक्कीच आपण सर्व शिवसेनेत आल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
अमित नहार, समाधान जाधव ,शिवदास पोकळे, रमेश राठोड यांनी यावेळी शिवसेना पक्षात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमदार सुहास कांदे यां चे आभार मानले.
यावेळी अध्यक्ष भाषणात बोलताना बापूसाहेब कवडे यांनी खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा तर सुहास यांच्यासारखा असावा याची प्रचिती येते असे गौरवर्थी उदगार काढले. अण्णा अतिशय एक सर्वसामान्य व्यक्तीशी सुद्धा आपुलकीने बोलतात आणि त्यांचे काम करतात कोणालाही मध्येच त्याची गरज पडत नाही किंवा समस्या घेऊन आल्यास तात्काळ काम केल्या जाते असा लोकनायक आपल्याला लाभणे हेही आपले नशीबच आहे असे त्यांनी बोलून दाखवले
याप्रसंगी व्यासपीठावर बापूसाहेब कवडे ,केशव राठोड, तेज कवडे ,राजे द्र जगताप, अनिल रिंडे, रफिक पठाण, गोकुळ कोठारी ,मनोज रिंडे, बंडू पाटील, गुलाब चव्हाण, प्रदीप सूर्यवंशी ,संजीव बोरसे, अनिल सोनवणे, दत्तू निकम, विजू सूर्यवंशी, नूतन कासलीवाल, काशिनाथ काळे, रामचंद्र राठोड, नामदेव राठोड ,समाधान जाधव, चंद्रभान कोरडे, भगवान पवार, राजेश सांगळे, सोनू दळवी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
सूत्रसंचालन अमोल नावंदर व राजाभाऊ देशमुख यांनी केले


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.