मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थेचे संवर्धक लोकनेते व्यंकटराव हिरे यांची पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए व्ही पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, लोकनेते व्यंकटराव हिरे यांचा जीवनपट सर्वांसमोर मांडला. लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे शैक्षणिक,सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदान सर्वांना सांगितले. तसेच त्यांनी आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्यामंदिर या दोन्ही संस्थांच्या विस्तारामध्ये कशाप्रकारे अनेक महाविद्यालये व आश्रम शाळा नाशिक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांमध्ये तसेच आदिवासी भागांमध्ये सुरू केल्या व शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य,गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवली याची माहिती दिली.तसेच सहकार क्षेत्रामध्ये काम करताना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,नाशिक जिल्ह्यातील अनेक संस्थांची पायाभरणी त्यांनी केली. तसेच बहुजन हिताय…बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला धरून आपले जीवन कार्य समर्पित केले असे सांगितले. तसेच व्यंकटराव हिरे यांनी सुरू केलेल्या विविध संस्था, महाविद्यालय शाळा या कार्यावर पण त्यांनी प्रकाश टाकला, या कार्यक्रमाचे औचित्य साधून, राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत वृक्षारोपण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए व्ही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग व संशोधन केंद्र प्रमुख प्रा. डॉ. किरण पिंगळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. डी. देसले, कुलसचिव, श्री. समाधान केदार शैक्षणिक सुपरवायझर, प्रा. डी.व्ही सोनवणे, एमसीव्हीसीचे उपप्राचार्य बच्छाव सर,
सर्व शैक्षणिक सुपरवायझर, विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, महाविद्यालयाचे पीआरओ प्रा. शरद वाघ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पवन सिंग परदेशी यांनी केले.

रा. स्व. संघ मनमाड जनकल्याण प्रकल्प समिती बैठक संपन्न
मनमाड - रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक चे कार्यवाह शैलेश...